Search

Entre प्रेरणा 2019Entre प्रेरणा 2019 ची कहाणी... ही कथा सत्यघटनेवर आधारित आहे. यात कोणताही संयोग नाही.

युवा चे व स्वदेशी चे आम्ही काही लोक बसलो होतो. चहाचा शेवटचा घोट संपता संपता दिलीप बोरकर काका म्हणाले, युवाची यावर्षीची कार्यशाळा पेंडिंग आहे. 'हो ना.. जुलै मध्ये असते, पण या पुराने माझा महाराष्ट्र वाहून गेला, करावा का?' असा विचार करतच होते की परिमल (Parimal Deshpande) म्हणाला, हो करू की, 15 दिवसांत तयारी चालू झाली, अनिल फोउजदार (Anil Phoujdar) काकांना निरोप दिला, काका यावेळी स्वदेशी जागरण मंच आणि युवा सोबत कार्यशाळा घेतील. काकांनी भेटायला बोलावले, स्वरूप विचारले, (ते कधीच नाही म्हणत नाहीत, माहीत आहे मला. आणि कार्यकर्त्यांच्या पाठीशी नेहमी ठाम असतात.) सुहास यादव आणि अनिल काका आले भेटायला, कॉफी वर काय काय असेल कार्यशाळेत, कसा असेल दिवस वगैरे ठरवले, उद्योजकांची ही मोठी नावं काढली, काकांच्या ओळखी तिन्ही लोकात आहेत ना. ते सोबत असल्यावर आम्ही कोणालाही आणू शकतो. काम वाटून घेतली, काका लोकांशी फोन वर बोलणार, आम्ही भेटून विषय मांडणार. चला असे करत वक्ते झाले तयार. आमच्या नगरसेवक दादा आहे. त्यांच्या कानावर घालताच, ते म्हणाले, 'इथे घ्या, अण्णाभाऊ साठेला. त्यांच्या माणसाला, गजानन दादाला सांगितलं, 'लेटर दे त्यांना, हॉल साठी द्यायला, रेट कमी करा, डिपॉझिट माफ करा.' ते असतातच उत्सही. मॅनेजरला भेटलो, झाले काम.

तसा विचार करता करता वाटलं, ओंकारला विचारावं, डिजिटल मार्केटिंग ही संकल्पना मांडू शकशील का? (omkar dabhadkar) झाला तयार, त्याचे स्पीच तर लोकांनी इतकं डोक्यावर घेतलं, की नंतर सर्वांनी ते थांबले का नाहीत म्हणून, आम्हाला भंडावून सोडलं. उषा बाजपाई या मुद्रा लोन च्या राष्ट्रीय संयोजिका यांनी सर्वांना मुद्राच्या वेगवेगळ्या लोकांना लागू होणाऱ्या योजनाची माहिती दिली, तसेच कोणाला अडचण आल्यास, त्यांना संपर्क करावा म्हणून त्यांचा नंबर openly सर्वांना दिला. आशिष कांटे हे ऐन वेळी मदतीला धावून आले, एवढेच नाही तर आमचा विश्वास वाढवायला, उदघाटन सत्रात 10-15 मिनिटे का होईना येऊन गेले. दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स च्या सीमा कांबळे, सुरेश उमाप आणि सुधीर कुळकर्णी यांचे प्रशिक्षण, सरकारी योजना, दलितांसाठी असणाऱ्या सवलती व योजना, इन्व्हेस्टमेंट आणि इन्शुरन्सचे ज्ञान हे असणे किती आवश्यक आहे हे ही समजलं. साठे सरांनी तर व्यवस्थापन शास्त्र याविषयावर लहान सहान उदाहरणातून दिलेलं मार्गदर्शन तर बेस्ट च होत.

आता श्रोते.. सर्व कार्यकर्ते कामाला लागले, फेसबुक कायप्पा वर मेसेज लिहिले पाठवले गेले. मयुरेश दादाला (Mayuresh Danke) भेटायला गेलो, अजून उद्योजकांना भेटायचं होतं ठरायचे होते. दादांनी सांगितले, यावेळी शेवटचं सत्र मुलाखतीच ठेऊ. वाह, मस्तच आयडिया. ठरलं. दादाला सांगितलं, तुम्हीच बसा मुलाखत घ्यायला. त्यांनी एक से एक नवनवीन व्यवसायिक सांगितले, त्यांचा संपर्क दिला, कमी दिवस होते कार्यक्रमाला पण सर्वच जण अनौपचारिक पणे, साधेपणाने, तयार झाले. कार्यक्रमाच्या दिवशी आम्ही यायच्या आधी गर्दी, परिमल आणि प्रथमेश बेल्हेकर गर्दी सावरत होते, माझे आजोबा ऍडमिट हे माहीत होते, त्यामुळे परिमलच्या आईनी सकाळीच पोहे आणलेले, महानतेश सकाळीच हार, फुले, समाईच तेल घेऊन आला, मधुरा नातू आणि तेजस्विता खिडकेने सूत्रसंचालन केले, त्यात तेजस्विता च्या कवितांनी तर मस्त रंग भरले.

शेवटचे मुलाखत सत्र चालू झाले, सर्व काही अनौपचारीक. मयुरेश दादांनी तर सर्वांना व्यवसायाबाबत, त्यांच्या व्यवसायाच्या फॅक्टर बाबत मोकळेपणे बोलते केलं. मिलिंद वेर्लेकर हे भारतातील एकमेव guiness book of world record चे सल्लागार आहेत. पण विनम्रता त्यांच्याकडून शिकावी, अक्षरधारा बुक गॅलरी चे रमेश राठीवडेकर यांच्याकडून व्यवसायात नावीन्य ठेवायला शिकावं, त्यांच्या जवळचे क्रॉसवर्ड बंद झालं. पण त्याची गॅलरी आजतागायत चालू राहून त्यांच्या 3 शाखा झाल्यात. कोणी कमी लेखल्यास आपण ते चालेंज घेऊन कसं पुढे जावं, स्वतःचा रस्ता स्वतः कसा शोधावा, हे दीपा परब या रणरागिणी महिला बाऊन्सर च्या संचालिका यांच्याकडून शिकावं. रोजच्या जगण्यात ऑटोमॅशन कसं आणावं? लोकांच्या गरजा ओळखून कस्टमर कसा शोधावा? हे सकस फूड्स च्या माधुरी सहस्त्रबुद्धे खूपच मस्त सांगतात. व्यवसाय व राजकारण यांची सांगड ही त्या खुप छान घालून, नगरसेविका पद ही भूषावतात. सुनीता ननावरे आणि सुवर्णा काटे या पार्टनर, पुण्याजवळच्या खेड्यात 2 महिन्यांपूर्वी व्यवसाय चालू करुन,दीड लाखाचा नफा कमावतात, धडपड करत स्वतःचा व्यवसाय करत, पोर बाळ, चूल सांभाळून स्वतःचे एक जग बसवण्याचा करत असलेला प्रयत्न, व्यवसायप्रति त्यांचे देडिकेशन हे सर्व स्वतःचा विचार करायला भाग पाडते.

स्वदेशी जागरण मंचाची अनिल काकांनी मांडलेली भूमिका ही युवकांच्या मनापर्यंत पोहोचली. खरेच बसलेल्या श्रोत्यांपर्यंत पोहोचायला कला लागते. राष्ट्रगाण होऊन कार्यक्रम संपला.

__रसिका राहतेकर

0 views

©2019 by Tejaswita Khidake.