Search

अब्रु

सध्य स्थितीला अनुसरून लिहिलेली एक विद्रोही कविता


"अब्रु"

मी शिक्षिका,

होते प्रेमात त्याच्या,

त्या प्रेमाचा प्रतीक, होणार होते आई मी

पण माझा गर्भ त्याने मारला

अन मला ही मारले जाळुनी

आता मिरवितो मंत्री होऊनी

कहर रे तुझ्या निर्लज्जतेचा..


मी विद्यार्थिनी,

शिकत होते संस्थेत तुझ्या ,

नजरेस पडले मी तुझ्या लिंगपिसाटा,

तु लुटुनी गेला माझी अब्रु तेंव्हा

माणसात लपलेला हैवान मी पहिला

अहंकाराच्या पुतळ्याला पाझर का फुटावा

धिक्कार तुझ्या दांभिकतेला..


मी लेक

तुझी बाप म्हणुनी मिरवितो तु,

दिवसा माझ्याकडून तु दंडवत घालवून घेतो,

लावितो मज तुझ्या पाया पडाया

परी रात्री म्हणतो "बाई चल आता"

अन करितो चाळे

बाप म्हणुनी "नालायक" तु

अर्थ नाही तुझ्या जगण्याला..मी वैद्य,

गेले रुग्णाची तपासणी करावया,

रचिले षडयंत्र नराधमांनी

केली स्कुटर खराब

अन मी मदतनिसाला स्कुटर नीट करावया पाठविले असता

त्या नराधमांनी घेरले मला

लुटली अब्रु माझी न इतक्यात आला मदतनीस

वाटले मज हा मला वाचवील पण दुर्दैव माझे

हातभार अब्रु लुटण्यास त्याने ही लाविला

आता होतील कोर्ट कचेऱ्या

अन होतील दावे खटले

मी मेले क्षणात अन

मला जाळुनी तुम्ही जिवंत अजुनही

आग लागो या कायद्याला..


कलियुगाची हीच महती मग

"अब्रु" शब्द मज फिक्का वाटे

तु नाही केवळ व्यभिचारी

फिरतो उंच माना करुनी

तुच तो राक्षसी अत्याचारी..


घे लावुनी गळफास तु ,

जगण्यास ना पात्र तु,

घे सायनाईड अन मार स्वतःला,

माणुसकीला कलंक तु,

मार उडी घाटामध्ये

टाक त्या शरीराला संपवुनी तु,

घे पेट्रोल चे शिंतोडे स्वतःवर

अन लाव काडी तुलाच तु ....

अन लाव काडी तुलाच तु ....


© तेजस्विता खिडके


0 views

©2019 by Tejaswita Khidake.