Search

हृदयाची भाषा

Updated: Nov 17, 2019किती विचित्र असते ना ही हृदयाची भाषा,

तुम्ही एकमेकांपासून किती दूर दूर असता,


प्रत्यक्षात कधी भेटलेले ही नसता ,

एकमेकांना फार ओळखतहि नसता,


एकमेकांविषयी च्या भावना ही अव्यक्त असतात,

तरीही एकमेकांविषयी काहीतरी वाटत असत,


म्हणजे ते कस हृदयाच हृदयाशी अस विचित्रच कनेक्शन असत...

कुठेतरी सहजच तुम्ही भेटता,


मग सहजच गप्पा मारता,

अन सहजच एकमेकांना आवडायलाही लागता,


कुणी स्पष्ट बोललेल नसत,

तरीही सगळच कळतही असत,

म्हणजे ते कस हृदयाच हृदयाशी अस विचित्रच कनेक्शन असत...


© तेजस्विता खिडके

0 views

©2019 by Tejaswita Khidake.