Search

स्त्री एक प्रेरणा


कृपाळु अशी ही दाता, हो ती विश्वात विजेता.

  भक्ती सागर अशी ही, कृष्णवेडी हो ती मीरा.


  प्रेमाळु जरी मनानी, नयनी असती ज्‍वाला.

  ना जुमानले चाळीसा, राज्यकर्ती हो ती रजिया.


  मायाळू अशी ती माता, बलीदानी त्यागमूर्तीका.

  शिवरायांची ती माय, जिजाऊ ची ही हो गाथा.


  रण चंडी ती कठोर, मर्दानी शक्तीधारिका.

  जनतेस वाचवाया, लढली मणिकर्णिका.


  काय होतं क ख ग घ, लोका वाटे अशिक्षित.

  सरस्वती वसे ओठी, नाव तिचे हो बहिणा.


  कीर्ती तिची हो विश्वात, देशात होती प्रधान.

  शत्रु तिला हो घाबरी, अशी होती ती इंदिरा.


  कोमल हृदयी नाजूकता, विश्व सुंदरी ती सुनयना.

  देशाची हो गौरविता,वाढवि ही ती ऐश्वर्या.


  कुणी माता कुणी पत्नी, मैत्रीण वा ती बहिण.

  स्त्री शब्द हा एकच, परी रूप हो अनेक.


  आसमंती ही गर्जना, प्रतिभा वा ती मलाला.

  बुद्धिमत्ता तिची अशी, घ्यावी सा-यांनी प्रेरणा.© तेजस्विता खिडके

0 views

©2019 by Tejaswita Khidake.