Search

स्ट्रॉबेरीची शाळा


स्ट्रॉबेरी वर नवीन पुस्तक येतंय म्हणे,

खरंय का ?

एका आमदाराला ही स्ट्रॉबेरी फार आवडायची म्हणे,

खरंय का ?

त्या आमदाराने स्ट्रॉबेरी ची फार मजा घेतली म्हणे,

खरंय का ?

खुश होऊन आमदाराने स्ट्रॉबेरीला शाळा काढण्यास फार मदत केली म्हणे,

खरंय का ?

एकदा गावातल्या पत्रकाराने आमदाराने स्ट्रॉबेरी खातानाचे फोटो काढले होते म्हणे,

खरंय का ?

स्ट्रॉबेरी ने मग पत्रकाराला जाम झोडले म्हणे,

खरंय का ?

स्ट्रॉबेरीच्या पुस्तकात हा किस्सा रंगणार नाही म्हणे,

खरंय का ?

आज स्ट्रॉबेरी फार नावारूपाला आली म्हणे,

खरंय का ?

तरी "बुंद से गयी वो हौज से नहीं आती" म्हणे,

खरंय का ?

स्ट्रॉबेरी वर नवीन पुस्तक येतंय म्हणे,

खरंय का ?


© तेजस्विता खिडके

0 views

©2019 by Tejaswita Khidake.