Search

स्किल इंडिया भारतात इतके महत्त्वाचे का आहे?

“कौशल्य”, हे केवळ भारताच्याच बाबतीत नाही तर आपण जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात जा, हे लागू होते .


आता भारताच्या बाबतीत बोलत असताना, भारत जगातील सर्वात मोठा लोकसंख्या असलेला देश आहे. लोकसंख्या अधिक आहे म्हणून त्यांच्या गरजा अधिक आहेत . परंतु, तेथे मर्यादित संसाधने आहेत; जसे आपण कृषी क्षेत्राचे उदाहरण घेऊ ;


शेतीची मूलभूत गरज म्हणजे जमीन, (जरी आजच्या जागतिक परिस्थितीत आवश्यक नसले जेथे टिश्यू कल्चर आणि तंत्र हे शेती क्षेत्रात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. ) आणि जमीन मर्यादित स्त्रोत आहे,


एक काल्पनिक उदाहरण घेऊयाः


जोइ यांच्याकडे 100 एकर जमीन आहे, त्याचे उत्पन्नाचे मूळ स्त्रोत शेती आहे, तो गहू उत्पादन करतो आणि त्याच्या शेतातून १000 टन गहू उत्पादित होते , त्याची शेती करण्याची पद्धत पारंपारिक आहे. आता त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या 4 मुलांसाठी जमीन 4 भागात विभागली गेली आहे.


त्यांच्या प्रत्येक मुलाला 25 एकर जमीन मिळाली, आता येथे प्रति व्यक्ती शेती जमीन पूर्वीच्या तुलनेत कमी आहे. (पूर्वी जोकडे 100 एकर आहे म्हणजे प्रति व्यक्ती 100 एकर जमीन) आता जमीन विभागली गेल्या मुळे जे उत्पादन होणार आहे ते अर्थातच कमी असणार आहे. म्हणजे,

पूर्वी प्रति व्यक्ती उत्पादन 1000 टन होते आता ते 250 टन कमी झाले आहे.


येथे एक गोष्ट लक्षात घेतली जाऊ शकते की, लोकसंख्या वाढली आहे परंतु स्त्रोत मर्यादित आहेत.


आता प्रश्न असा आहे की या समस्येचे निराकरण कसे करावे?

तर ही समस्या सोडवण्यासाठी उपलब्ध स्त्रोतांचा अधिकाधिक वापर करणे आवश्यक आहे, कारण संसाधने मर्यादित आहेत, आपण असे म्हणू शकतो की संसाधने कमी आहेत, बरोबर ?म्हणून मर्यादित स्त्रोतांचा उपयोग करण्यासाठी, इथे शेती च्या बाबतीत जमीन हा मर्यादित स्रोत, म्हणुन जोइ च्या चारही पुत्रांना मर्यादित जमिनीमधून अधिक उत्पादन करण्यासाठी काही कौशल्ये विकसित केली पाहिजेत.


आणि म्हणून सर्वाइव्ह करण्यासाठी येथे ग्रीन हाऊस / पॉली हाऊस तंत्रज्ञान किंवा व्हर्टिकल फार्मिंग किंवा उच्च उत्पन्न देणार्‍या वाणांचा वापर करून अधिक कृषी उत्पन्न घेता येऊ शकते .


औद्योगिक क्षेत्र किंवा सेवा क्षेत्रासारख्या अन्य क्षेत्रांमध्ये हीच परिस्थिती आहे, लोकसंख्या कौशल्य विकासासाठी तत्पर नसेल तर बेरोजगारी अधिक वाढून त्यामुळे दरोडे, गुन्हेगारी इत्यादी विविध सामाजिक दुष्परिणाम होऊ शकतात.


इंग्रजीमध्ये असे म्हणतात कि "There is a struggle of the fittest", म्हणजे जो सर्वात योग्य असेल तोच टिकणार, म्हणून

आपण सिंह आहात कि हरीण आहात याने फरक पडत नाही, कारण इथे सिंह जर हरणाला पकडण्यासाठी वेगाने धावला नाही तर कदाचित त्याची उपासमार होऊन तो मृत्यू पावू शकतो आणि जर सिंहापेक्षा हरीण वेगाने धावले नाही तर सिंह त्याची शिकार करेल ; म्हणून नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा आपण धावायला सुरुवात करावी .


जय हिंद0 views

©2019 by Tejaswita Khidake.