©2019 by Tejaswita Khidake.

Search

सेकंड हैंड गाड़ीबापाच्या माघं लागलो व्हतो मी, आवं

बापाच्या माघं लागलो व्हतो मी,

नवी गाड़ी घेवून दे काय।


बापूस म्हणे राजा सी टी १०० घे,

तीचा अवरेज लई जबरया हाय।

बापाला बोल्लो पल्सर पाहिजे, ऐकला का मंडळी।


बापाला बोल्लो पल्सर पाहिजे,

तुझ्या बाता मी ऐकायचो न्हाय;

बापूस बी आमचा लई खत्रया बरका मंडळी,

सेकंड हैंड गाड़ी माझ्या गळ्यात मारली,

लई पसतावा करितो हाय।


पुण्याला एकदा चलो व्हतो मी , पुण्याला एकदा चलो व्हतो मी ,

बसलो तिच्यावर ऐटिट लई मी, बसलो तिच्यावर ऐटिट लई मी,

भर रस्त्यात झाला पचका।


इंजिन बंद पड़लं तीच, गाढव मी ठरलो,

तिला व्हढ़तं आणली म्या।

भिक नगं, आर भिक नगं पन कुत्र आवर तुझ

माला नग ती पल्सर राव।

सेकंड हैंड गाड़ी माझ्या गळ्यात मारली,

लई पसतावा करितो हाय।


© तेजस्विता खिडके

1 view