Search

सत्यजीत


विश्वशांती हेचि लक्ष्य सदा अंतरी असावे,

परी दोष्याना समज देण्या शिक्षा देणे ही मग कल्याण होत

कपट कारस्थान करणाऱ्यांवर असावे लक्ष सदा

अन गुप्तहेर हि पडताळावे, सेना असावी सदा सज्ज ...


व्हावे रक्षक रंजल्या गांजल्यांचा

घ्यावा आशीर्वाद सज्जनांचा

राहावे अंतःकरण शुद्ध सदा

हाची यत्न असावा ...


ते परम सत्य काय असावे ?

त्या ज्ञानाचा शोध हेचि असावे तुझे लक्ष्य

होऊनि दक्ष सावर मनाचा पक्ष ...


जन्म तुझा रे सत्या आहे एक यज्ञ

कर तु यत्न, तार या मायारूपी संसाराला...


सोडुनी अहम शोधिसी स्वतःला

आत्मारुपी ईश्वर ध्यानस्थ तुझ्याच अंतरी ...


षडरिपु होत, काम क्रोध लोभ मोह मंद मत्सर

जिंकणे याना परी अति कठीण

जिंकुनी याना होशील पार तु,

मग रे खरा "सत्यजीत" तु ...


जिंकुनी स्वतःला होशील आत्मज्ञानी

मग होशील प्रधान या चराचराचा

अन होशील विश्वजित ही तु .....

अन होशील विश्वजित ही तु .....© तेजस्विता खिडके

0 views

©2019 by Tejaswita Khidake.