©2019 by Tejaswita Khidake.

Search

शिवमय










मनातला मळ साफ झाला कि मग कसं

एखादं जुनं धुळीने माखलेलं अगदी जीर्ण झालेलं चित्र ही

साफ सुंदर अन स्वछ दिसायला लागतं...


एकदा का मनाचा चष्मा पारदर्शक झाला कि मग कसं

सगळं जग जणू गोंडस निरागस अन अद्भुत वाटायला लागतं...


विचारामध्ये शुद्धता आली की मग कसं

संपुर्ण विश्व च जणु साजुक तुपासारखं स्वच्छ सुगंधी अन पवित्र वाटलं लागतं ...


मनातला मळ साफ झाला कि मग सगळं कसं

सुखमय आनंददायी अन आल्हाददायी वाटायला लागतं...


मनातला मळ साफ झाला कि मग कसं सगळंच

स्वछ , सुंदर अन शिवमय दिसायला लागतं...

सगळंच शिवमय दिसायला लागतं...


© तेजस्विता खिडके

3 views