Search

शिवत्व


स्वातंत्र्य ते काय असावे ?

पाण्यावर धावावे

अन पक्षासवे आकाशात उडावे

अंतरिक्षाचेही भ्रमण करावे

भुत, वर्तमान अन भविष्याचे ही प्रवासी व्हावे ...


स्वर्गात भ्रमण करावे

पाताळावरही लक्ष असावे

या भुतलावरल्या कणाकणाचे

स्वामित्व धारण केल्याचे ज्ञान असावे ...


स्वातंत्र्य ते काय असावे ?

मना पलीकडच्या मनावर नेत्र असावे

दृष्टीच्याही पलीकडच्या सृष्टीवर ध्यान असावे

अंतःकरण शुद्ध असावे

हृदयी समाधान असावे

अन शिवत्वाचे साक्षात्कारी व्हावे

"शिवत्व" स्वातंत्र्य ते हेचि असावे ...

स्वातंत्र्य ते हेचि असावे ...


© तेजस्विता खिडके

0 views

©2019 by Tejaswita Khidake.