©2019 by Tejaswita Khidake.

Search

लाचारी


पैसा मार्केट मध्ये येण्यास सुरुवात होणार ,

काय भाव मग आता एका मताची किंमत ठरणार ?


परत एकदा खुद्दार लोकांची खोटी खुद्दारी दिसणार ,

दारू,मटण ,दम दट्या पाण्यासारखा पैसा वाहणार ,


नाहीतरी पाच वर्षात एकदा चान्स भेटतोय पैसे मिळायचा,

असंही दुसर काही यांच्याकडून आपल्याला मिळत तर नाहीच,


येउदेत, असं म्हणुन लोकही सरळ भेटेल तेवढा पैसा घेणार,

परत एकदा मक्कारांची मक्कारी दिसणार,

लाचारांची लाचारी दिसणार,


लाचारी पैश्यासाठीची, लाचारी पदासाठीची ,

लाचारी सत्तेसाठीची, लाचारी खोट्या अहंकाराची

लाचारी शक्तिप्रदर्शनासाठीची, लाचारी गुंडगिरीची ,

लाचारी हुकूमशाहीची, लाचारी घराणेशाहीची ,

लाचारी खोट्या सन्मानाची, लाचारी खोट्या दिखाव्याची,

कीव वाटते या लाचार प्रवृत्तीची,


लाचार लाचार्यांची तितकीच लाचार मानसिकता.. 


© तेजस्विता खिडके

1 view