Search

राजकारण राजकारण खेळूया


राजकारण राजकारण खेळूया,

लोकसभेचे सीट तुम्ही घ्या,

विधानसभेचं आम्ही घेतो,

सगळे थोडं थोडं वाटून खाऊया,

लोकांना यड्यात काढूया,

राजकारण राजकारण खेळूया....


कार्यकर्त्यांना भुलवूया ,

पदाच आमिष दाखवूया,

पैश्याचा पाऊस पाडूया,

राजकारण राजकारण खेळूया....


प्रेमाने नाही तर दमदट्या करूया,

मतांची पेटी पळवू या ,

दारू मटण वेश्या पुरवू या,

चमच्यांना कामाला लावूया,

राजकारण राजकारण खेळूया....


गुन्हेगारी वाढवूया,

आपणच अडकवूया,

आणि आपणच सोडवुया,

कांढयांची संख्या वाढवूया,

राजकारण राजकारण खेळूया....


© तेजस्विता खिडके

0 views

©2019 by Tejaswita Khidake.