Search

या अंधाऱ्या राती

Updated: Jan 28


या अंधाऱ्या राती, एकटेच चालत राहावे

होऊनी निर्भय स्वतःच प्रकाश व्हावे ...


प्रवास खडतर आहे

दगड धोंडे वाटेत असंख्य

तरीही न थकता, न हरता पुढे पुढे

चालत राहावे..


भयाण शांतता अन,

लांब कुठेतरी ओरडणारे पशु

किरकिर करणारे कीटक

अश्यात स्वतः च मशाल व्हावे

अन न घाबरता पुढे पुढे

चालत राहावे..


या अंधाऱ्या राती, एकटेच चालत राहावे

होऊनी निर्भय स्वतःच प्रकाश व्हावे ...


© तेजस्विता खिडके

0 views

©2019 by Tejaswita Khidake.