Search

यक्षिणी
लावण्यवती तु अप्सरा

जाहलो बेभान पाहुन तुजला..


देखणे रूप तुझे

लाजवी उर्वशीला..


कमल नयन तुझे

पाहुनी मी कावरा

हरवतो स्वतःला अन

बुडतो या अथांग भवसागरा

यक्षिणी तु चंचला..


मनमोहक बांधा तुझा

विश्वकर्त्या ने घडवला असा

स्वप्नी मज तुच दिसे

आश्चर्य हे माझे मला..


स्मित हास्य तुझे

पाहुनी होतो मी खुळा

कामेश्वरी तु विश्वसुंदरा

लावण्यवती तु अप्सरा

जाहलो बेभान पाहुन तुजला..

© तेजस्विता खिडके

0 views

©2019 by Tejaswita Khidake.