Search

मेरुदंडकधी कधी वाटते की तु

त्या मारुती सारखीच आहे ...


तो नाही का सूर्या ला

गिळंकृत करायला निघाला होता,

तुझं ही तसंच...


तो नाही का मनाला मागे टाकुन धावायचा

तुझं ही कदाचित तसंच आहे ...


तो कसा विजेसारखा चपळ

अन तु चंचल ...


त्यानी नाही का शून्य मंडळ भेदलं

तु ही भेदशील कदाचित ...


तो नाही का कधी अणु तर कधी ब्रह्मांड

तु ही तशी होशील कदाचित ...


तो नाही का मेरू पर्वतांपेक्षा मोठा आकार घ्यायचा

तुझा मेरुदंड ही तुला तसं बनवेल कदाचित ...


© तेजस्विता खिडके

0 views

©2019 by Tejaswita Khidake.