Search

मी तुम्हाला शिव्या देते


करीता ढोंगे,

पांघरूनी सोंगे,

खरे काय रूप तुमचे,

जगास ठाऊक रे

काय अस्तित्व तुमचे,

अरे दुतोंडी गांडूळानो,

मी तुम्हाला शिव्या देते।।


काय दाखविता तो बाणा,

बोलता एक वागता एक,

जनास लाउनि नादि,

दाखविता खोटी आशा,

खोटे तुमचे शब्द रे

खोटी तुमची भाषा,

अरे खोटारद्यानो,

मी तुम्हाला शिव्या देते।।


संस्कृतीच्या पदरामागे,

लपूनि खुशाल करता चाळे,

स्त्रीची अशी आसक्ति तुम्हा,

आपली परकी कोण ना कळे,

वासनांध श्वानासवे धावे,

चोहिकडे श्वापदें,

अरे उन्मत्त श्वानानों,

मी तुम्हाला शिव्या देते।।


लोका सांगे ब्रम्हज्ञान,

स्वतः कोरडे पाषाण रे,

स्वतःच ठेउनि झाकून,

किती पहाल वाकून दुसरीकडे,

चालता ताठ माना करुनि,

फाटकी तुमची नीति रे,

नासांनसांतुन भ्रष्ठाचार वाहे,

तुम्हा न दैवाची भीति रे,

अरे नीतिहीन भ्र्ष्टाचार्यानो,

मी तुम्हाला शिव्या देते।।


तुम्हा न जमले पीढ़ी घड़वाया

पुढे सरसावले बिघडवाया,

क्षणिक सुखासाठी तुम्ही

कितींची करणार उध्वस्त घरे,

जगावया ना पात्र तुम्ही,

कितींना दाखविता डोळे,

ठाऊक सर्वा लायकी तुमची,

जग ना राहिले भोळे,

अरे भ्रष्ट नालायकानो,

मी तुम्हाला शिव्या देते।।


अजुनी आहे वेळ हाती,

चुका सुधरवाया होउनि पश्चातापी,

अंतरीचा दैव तुमच्या,

आवाज देई दबक्या स्वरात रे,

अश्रु गाळुनि एकदा,

दे स्वतःला पापांची शिक्षा,

माग दये ची भिक्षा,

माणुस म्हणुनी जन्म तुझा,

होउ नकोस जनावर रे,

न होई जाणीव जयास ही,

अश्या जनवरांनो मग ,

हो तुम्हालाच मी शिव्या देते।।


© तेजस्विता खिडके

0 views

©2019 by Tejaswita Khidake.