Search

माणुसकी
इथे प्रत्येकाने एक मुखवटा लावलेला, समाजात वावरण्यासाठीचा मुखवटा वेगळा, इतर वेळी चा मुखवटा वेगळा, मग कधीतरी जेंव्हा खरा चेहरा समोर येतो च, तेंव्हा कळते की स्वार्थी जगात ही लोकं आपली नव्हतीच कधी, अन् मग खरच नको वाटतात ही खोटी लोकं....


इथे हळवं असण्याला किंमत नाही, इथे असतो तो फक्त व्यवहार, बाबा नेहमी सांगायचे की जगात फक्त व्यवहार असतो, लहानपणी व्यवहार म्हणजे नेमके काय हेच कळत नव्हतं, आता मात्र बरीच कोडी उलगडताय, अन् मग कुठेतरी स्वतःमध्ये च गुंतुन राहावं असं वाटतं, कारण आता खरच नको वाटतात ही खोटी लोकं....


इथे अश्रूंना किंमत नाही, इथे शरीराची बोली लावली जाते, जगण्यासाठी जेंव्हा स्वतःच्याच पत्नी ला तो व्यवहार करायला लावतो, तेंव्हा खरंच माणुसकी वरचा विश्वास मात्र उठतो, छातीत सुरा भोसाकल्यावर ज्या असहनिय वेदना होत असतील, त्याहीपेक्षा जास्त वेदना ह्या व्यवहाराचा अर्थ समजल्यावर होतात, अन् मग "न तातो न माता न बंधुर न दाता” अस म्हणत

डोळे झाकुन घ्यावे आणि हिमालयात निघुन जावं असं वाटतं, कारण आता खरंच नको वाटतात ही खोटी लोकं...


© तेजस्विता खिडके

0 views

©2019 by Tejaswita Khidake.