Search

माझ्या कडे परत येऊ नकोस

Updated: Jan 5

दुःखात होतीस तेंव्हा मी च दिसले तुला,

तुझी सांत्वना करायला माझीच आठवण तुला आली,

आता मात्र शहाणी झालीस, माझी गरज तुला उरली नाही, ऊद्या परत अडचणीत आलीस की माझी आठवण मात्र काढू नकोस,

आता सल्ला मसलत करायला माझ्या कडे परत येऊ नकोस...

कोण्या एका मुर्खाच्या नादी तु लागलीस, दोन मिंटाचा खेळ अन् तु महागडी भेट देऊन बसलीस,

मग जेंव्हा कळले तुला तुझा वापर होत आहे,

पेटून उठलीस अन् मग त्याची जिरवायला माझीच आठवण तुला आली,

आता परत त्याच्याशी तु गोड झालीस,

अन् मला मात्र वेड ठरवुन तु जगापुढे शहाणी झालीस,

आता उद्या परत फसवणुक झाली की माझी आठवण काढू नकोस,

आता तुझे रडगाणे गायला माझ्या कडे परत येऊ नकोस...

स्वतः वेड्यात निघालीस मग तुझ्या तळपायाची आग मस्तकात गेली,

मग तु इतर पोरींना शहाणी करायला निघालीस,

गडबड घोटाळ्या मध्ये तूच तडजोड केलीस,

तडजोड च करायची होती मग माझ्यापाशी का रडलीस, आता उद्या परत गडबड झाली की माझी आठवण काढू नकोस,

आता तुझी हुशारी दाखवायला माझ्या कडे परत येऊ नकोस... माझ्या कडे परत येऊ नकोस....

© तेजस्विता खिडके

0 views

©2019 by Tejaswita Khidake.