Search

मी अन तु अन सर्वस्व एक आहे.

Updated: Jan 28


तुज मी कळेल इतकी सोपी मी नाही,

अन जितकी वाटे कठीण तितकी हि नाही...


मी पणा सोडून पाहशी मज,

मग तुजसाठी अमृत प्राशन...


होऊनी अहंकारी दाखविशी मज,

तर तुजसाठी मृत्यु द्वार...


या विश्वशक्तीचे साक्षी अंतर्मन तुझे,

आहे सरळ सोपे तुझे तुजपाशी च

परी तु का शोधिसी चोहीकडे...


आत्मतल्लीन होऊनि पाहशी तु जेंव्हा अंतरी,

मग कळेल तुज मी, अन तु अन सर्वस्व एक आहे...

मग कळेल तुज मी, अन तु अन सर्वस्व एक आहे...


© तेजस्विता खिडके

0 views

©2019 by Tejaswita Khidake.