©2019 by Tejaswita Khidake.

Search

महामानव
त्या शुक्राप्रमाणे निश्चितता धारण करणारा

स्वच्छ अन आत्मतल्लीन तारा तु ..


त्या मांगल्यपूर्णतेचे सौंदर्य धारण करणारा

निर्भय, निडर योद्धा तु ..


त्या गुरु प्रमाणे ज्ञान धारण करणारा

सौभाग्यशाली अन भाग्यदायी तु ..


त्या सवितेचं तेज धारण करणारा

प्रकाश पुंज तु ..


त्या सोमा ची शीतलता धारण करणारा

सौम्य तारा तु ..


त्या शनी प्रमाणे धैर्य धारण करणारा

शूर वीर तु ..


त्या पाऱ्या सारखी चकाकी धारण करणारा

विवेक तु ..


त्या मित्रा प्रमाणे आत्मोन्नती झालेला

सुर्यमुखी तु ..


त्या चंद्रा सारखा स्मित हास्य करणारा

महान वैज्ञानिक ऋषी तु ..


त्या अफाट सूर्यमालेच्या एकत्रीकरणातुन निर्माण झालेला

महा तेजस्वी महा पराक्रमी

पशुपती महा देव तु

आदी देव आदी शक्ती तु

परम शिव महा मानव तु

पशुपती महा देव तु ...


© तेजस्विता खिडके

6 views