Search

मला रावण व्हावंस वाटलं

त्यांनी जय श्रीराम चे नारे देत जेंव्हा हिंसा केली तेंव्हा

मला रावण व्हावंस वाटलं...


त्यांनी धर्माच्या आडून सामान्यांचा घात केला तेंव्हा

मला रावण व्हावंस वाटलं...


वेदांच्या, शास्त्रांच्या आड लपून त्यांनी महिलांच्या स्वातंत्र्याचा गळा घोटला तेंव्हा

मला रावण व्हावंस वाटलं...


चातुर्वर्ण्य व्यवस्थेच्या आहारी जाऊन त्यानीं पाशवी अत्याचार केला तेंव्हा

मला रावण व्हावंस वाटलं...


धर्म अधर्म चा विळख्या मध्ये अडकवून त्यानी समाज व्यवस्थेचा खेळ केला तेंव्हा

मला रावण व्हावंस वाटलं...

मला रावण व्हावंस वाटलं...

© तेजस्विता खिडके

0 views

©2019 by Tejaswita Khidake.