Search

भाडखाऊ लेखककोणतीच धड डिग्री पुर्ण नाही

अन कॅमेरा घेऊन बोंबलत हिंडतो ...


आज इकडं उद्या तिकडं

आज या बाई माघ उद्या त्या बाई माघ

चोरुन फोटो काढीत हिंडतो ...


आज या नेत्या कड

उद्या त्या नेत्याकडं

बायांचे फोटो दाखवीत हिंडतो ...


आज या पोलीस स्टेशन ला

उद्या त्या पोलीस स्टेशन ला

खिसा गरम करायला हजेरी लावतो ...


आज या बंगल्यावर

उद्या त्या बंगल्यावर

चाट्यावाणी लाळ घोटत हिंडतो ...


आज या वर्तमान पत्राच्या हापिसात

उद्या त्या वर्तमान पत्राच्या हापिसात

खऱ्या खोट्या बातम्या लिहीत सुटतो ...


भाडखाऊ लेखक

जिथं नाही तिथं भाड खात सुटतो ...

जिथं नाही तिथं भाड खात सुटतो ...


© तेजस्विता खिडके

0 views

©2019 by Tejaswita Khidake.