©2019 by Tejaswita Khidake.

Search

भाऊबीज स्पेशलबोलवून सुद्धा आला नाही, अन् साधा फोन सुद्धा करता आला नाही, मी चिडलिय....

भाऊबीज स्पेशल

रुसलेल्या बहिणी ची लहान भावावर हक्क गाजवतताना चे वर्णन करणारी कविता,

तुझ्या बालवाडी च्या एडमिशन ला कोण आलं होत तुला आठवत का? मोठी बहीण ना रे मी तुझी इतक्या लवकर विसरलास का? आता शहाणा झालास तु पैसे कमवायला लागलास तुला माझ्या साठी वेळ नाही आता कधी कुणी वेड्यात काढलं तर मला सांगायला येऊ नकोस रहा तुझ्या अहंकारात, परत माझ्या कडे येऊ नकोस...


लहानपणी मित्राने तुझ्या खिशातले पन्नास रुपये घेतले म्हणुन माझ्या कडे रडत रडत आला होतास मीच होते ना तुझ्या साठी भांडायला आता मात्र तु मोठा झालास तुला माझी गरज उरली नाही उद्या तुझी फसवणूक झाली की मला सांगायला येऊ नकोस आता रहा तुझ्या मोठेपणात, परत माझ्याकडे रडत येऊ नकोस...


लॉ कॉलेज ला एडमिशन घ्यायला आला होतास, कॉलेज च्या प्राचार्य ने तुझी एडमिशन नाकारली होती, झालेल्या प्रकारा विरूद्ध आवाज उठवायला कोण होत? विद्यापीठात अर्ज तक्रार करून तुला प्रवेश मिळवून देण्याचं योगदान कोणाचं होत? आता मात्र चार मोबाईल रेपेयर करून तु स्वतःला फार महत्वाचं समजायला लागलास, आता परत अडचणीत आलास की मला फोन करू नको रहा आता असाच महत्त्वाचा, परत माझ्या कडे येऊ नकोस...


© तेजस्विता खिडके

3 views