Search

फक्त एक श्वास

Updated: Oct 11, 2019


फक्त एक दिवस माझ्यासाठी देशील का ?

हवं तर सोडून जा लगेच,पण थोडा वेळ सोबत थांबशील का ?


फक्त एकदा माझा हात, तुझ्या हातात घेशील का ?

हवं तर सोडुन दे लगेच, पण घट्ट पकडशील का ?


फक्त एकदा मला तुझ्या मिठीत घेशील का ?

हवं तर सोडुन दे लगेच, पण आठवणी देशील का ?


फक्त एकदा मला तुझ्या खांद्यावर डोकं ठेउ देशील का ?

हवं तर निघुन जा लगेच पण एकदाच भेटशील का ?


फक्त एकदा मला तुला डोळे भरून पाहु देशील का ?

हवं तर पाठ फिरंव लगेच, पण मनसोक्त रडू देशील का ?


फक्त एक श्वास माझ्या नावाचा घेशील का ?

हवं तर सोडुन दे लगेच, पण काळजापर्यंत नेशील का ?


© तेजस्विता खिडके

0 views

©2019 by Tejaswita Khidake.