©2019 by Tejaswita Khidake.

Search

निस्ता गु

मेसेज वर मेसेज

कार्यकर्त्यांची ही शाळा

या पिसाटांचा ऑनलाईन

सुळसुळाट झाला


मेसेज वर मेसेज

पोऱ्या बावचळला

म्हणतो माझ्यासंग एकदा

व्हॉइस चॅट कर ना

काय कर ? चॅट कर


निम्या गौऱ्या मसणात

केसाला केला डाय

मला करून फोन म्हणतो

काय ग कसं काय ?


मेसेज वर मेसेज

दिला तुझ्या मैत्रिणीनी नंबर

राहते किती फॅशनेबल

घायाळ करी तुझी कंबर


चांगलं चुंगलं बोलुन झालं

झाली औपचारिकता

शांत कुठं बसवतं

बाबा चा किडा वळवळला

म्हणला बाई माझ्यासंग चॅट कर ना

काय कर ? चॅट कर


पोरीच्या वयाच्या पोरीशी

याला चॅट करावा वाटतो

चॅट करावा वाटतो अजुन काय करावा वाटतो ?

वय गेलं पण अक्कल आली नाही

तिरड्या गेल्या पण

मन भरलं नाही ... नाही भरलं नाही ....


भेन्चोद झालं मादरचोद झालं

झालं बकचोद

राहिला फक्त एक शब्द

हा घ्या नवा.. काय ? "पोरचोद"...काय ? नवा "पोरचोद"...


नाव कमवल पैसा कमवला

शेवटी घातली आई

पैश्याचा माज केल्यापायी घर वाया जाई ...


देव देव करायच्या वयात

याचा मोगरा फुलाला

साठी बुद्धी नाठी

डोक्यात निस्ता गु भरला ... काय भरला ? गु भरला ...


© तेजस्विता खिडके

31 views2 comments