Search

निशब्दतुझं माझ्यासाठीचं प्रेम

मी तुझ्या डोळ्यात कधीच पाहीलं होतं.


तुला माझ्याकडे चोरून बघताना,

अन् पकडल्या गेल्यावर नजर फिरवताना ही मी तुला पाहीलं होतं.


हे असं तुझं निशब्द होणं, अन् अनामीक राहणं,

आजही हेच सांगतं कि आपल्यात कुठेतरी प्रेम होतं.


जगाचं जाउदे रे जगाला कधी कळला प्रेमाचा अर्थ,

जग काय म्हणेल यातंच गेला बराच काळ व्यर्थ.


बस तु नेहमी आनंदित रहा

एवढंच सांगायचं होतं,


मला विसरलास तरी चालेल पण तुु मात्र प्रगतीच्या शिखरावर पोहोच

मला एवढंच म्हणायचं होतं.


तुझं माझ्यासाठीचं प्रेम

मी तुझ्या डोळ्यात कधीच पाहीलं होतं.


© तेजस्विता खिडके

0 views

©2019 by Tejaswita Khidake.