Search

निर्लज्ज

Updated: Jan 28


सामन्यांच्या आवाजाशी ईथे कुणाला च घेणं देणं नाही, इथे आपण कितीही ओरडलो तरी आपलं ऐकाणार कोणीच नाही.. लोकशाही चा चौथा स्तंभ म्हणजे मीडिया, तो ही साला विकल्या गेलेला.. खऱ्या बातम्या कोणीच सांगताना दिसत च नाही, आहेत त्या फक्त विकत घेतलेल्या बातम्या.. मग एखादा सामान्य आवाज उठवायला पाहतो, तर त्याचा ही आवाज दाबला जातो.. सोशल मीडिया वर कोणी एक जरी मुद्दा उठवला, तर त्याचा खेळ खल्लास.. मग धमक्या, फोन टॅपिंग, प्रत्येक हालचाली वर वॉच, ही कसली लोकशाही रे,ही तर हुकुमशाही, हिटलर शाही.. सरळ सांगा ना राव, इथे झुंडशाही च आहे, आवाज चढवायचा नाही, लोकशाही चा खोटा देखावा तरी कशासाठी.. काढून टाकावे का ते शब्द संविधानातून, कि संविधानच हटवून टाकायचं ? कारण ते असूनही त्याची हवी तशी अंबलबजावणी खरंच होते का? हा ही एक मोठा प्रश्न च की.. जो आवाज उठवतो त्याचा आवाज दाबला जातो, नाही तर त्याच्या नरडीचा घोट घेतला जातो, अन् मग अश्या त लोकशाही वरचा विश्वास मात्र उठायला लागतो.. सगळी यंत्रणा विकत घ्याल, जगाला स्वतःविषयी ची महानता दाखवाल, पण तुमच्या मनाचं काय? निर्लज्ज होऊन जगत मात्र तुम्ही आहातच पण एक दिवस कुत्रे हाल खाणार नाहीत, कारण जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर... © तेजस्विता खिडके

0 views

©2019 by Tejaswita Khidake.