Search

नवा कुलर आणून दे काय

उन्हानी वैतागलेल्या रसिकांसाठी,

थंडगार कुलर वाली, ताजी ताजी मजेशीर कविता। कशी काय वाटली ते नक्की सांगा बर का।उन्हानी तापली जमीन अन ह्यो पत्रा बी गरमाटलाय,

आग, उन्हानी तापली जमीन अन ह्यो पत्रा बी गरमाटलाय,

आता कसकाय करू रानी ग लयी बेक्कार घाम फुटलाय।


करू नको वटवट कर जरा खटपट,

आर,करू नको वटवट कर जरा खटपट,

तुझ्या खुराड्यात मी रहाणार न्हाय,

तोंडात बळ माला दावतों शीताफळ,

खुळी मी वाटले काय।गरीबी आपली पत्र्याच घर हाय,

आग, गरीबी आपली पत्र्याच घर हाय; तोंडावर बोलतुया,

पन रानी तुला सुखात ठेवीन शब्द हा आपला हाय।


तोंडाच्या वाफा दावू नको तु ,

आर, तोंडाच्या वाफा दावू नको तु, लयी बोर मारतुया,

थोबड़ कर हासर नी जाय जरा तिकड,

मला कुलर आणून दे काय।

आर ऐ, ध्यानात ठिव, जुना नाय नवा,

नवा कुलर आणून दे काय।


© तेजस्विता खिडके

0 views

©2019 by Tejaswita Khidake.