©2019 by Tejaswita Khidake.

Search

तुला तुझी गोष्ट सांगु ?
तुझं ते दुःख मी पाहिलंय

तु कितीही लपविण्याचा प्रयत्न केला तरी मला ते दिसलंय ...


तुला तुझी गोष्ट सांगु ?


कळत नकळत तुझ्याकडुन जे घडलं

त्याचं वाईट वाटणं साहजिक आहे

जगासमोर तु कितीही यशस्वी असण्याचा

अन आनंद दाखवण्याचा प्रयत्न केला तरी

कायम "ती" गोष्ट सलतेय ...


बाहेरून किती रे चका चौंद दाखवतोस तु

मग एकाकी असताना का रडतोस ?


अंतर्मन दुःख देतं ना ?

स्वतःमध्ये डोकावुन पाहिलं की पोकळ पणा जाणवतो तुला, बरोबर ना ?


अंतर्मन तुला स्वीकारत नाही म्हणुन कमीत कमी

बाहेरच्या जगात तरी तुझा स्वीकार व्हावा

असं तुला नेहमी वाटत असतं, बरोबर ना ?


किति रे धावशील ? स्वतःपासून ?

स्वतःच्या स्व पासुन ? तुझ्यातल्या तु पासुन ?


पाप पुण्य काय त्याच्या खोलात मी जाणार नाही

पण तुला तर सगळंच माहित आहे तुझ्या विषयी

आता तोच गाडा ओढत न्यायचा की स्वतःला परिवर्तित करायचं ?

स्वतःला अजुन दुःख द्यायचे आहे कि लक्ष्य मिळवण्यासाठीचा रस्ता बदलायचाय ?

तुझं तुच ठरवायला नको का ?


© तेजस्विता खिडके


3 views