Search

तु लढत चल

Updated: Jan 28ज्याला त्याला मृत्यु च भय, जगण्यासाठी ची धडपड, दुखंण ही असं की सांगता येतं नाही अन् सहनही होत नाही, या मध्ये तु एकटीच वाघीण आहेस असं समज , तु लढत चल ग तु लढत चल... भीती कशाची, दारिद्र्याची की मरणाची दारिद्र्यात तर गांधी ही जगले, तरी नोटेवर आजही दैदिप्यमान.. अन् भगत सिंग ऐन तारुण्यात फाशी गेले, तरी मनामनात क्रांती च्या रूपाने आजही प्रज्वलित.. तु ही तुझी ज्योत तेवत ठेव, जरी अंधार तुझ्या दिव्या खाली तु तुझ्या तेजाने तुझ्या परीने जग प्रकाशित करत चल, तु लढत चल ग तु लढत चल... आज आहेस उद्या नसशील, तु कसं जगलीस याला तिळमात्र किंमत ग, तु जगास काय देऊन गेली याची महती अगम्य ग, हरून खचून चालणार आहे का, घेतला वसा टाकून चालणार आहे का, तुच तो धगधगता सुर्य, तुच तो झगमगता चंद्र, तुच तो अग्नी, तुच तो प्रकाश, तुच शुन्य ग अन् तुच सत्य शिव, तुझ्यातल्या असिमतेची ही पृथ्वी साक्षी ग, तुझ्यातल्या अगम्यातेची ही त्रिवार विश्व शक्ती साक्षी ग, तु लढत चल ग तु लढत चल... © तेजस्वीता खिडके

0 views

©2019 by Tejaswita Khidake.