Search

तेजस्वी ध्रुविता


ती धैर्या च होती जिने तुला इथवर आणलाय

ती धैर्या च आहे जी तुला नेहमी साथ देईल ....


जी गेली ती खरी मैत्रीण कधीच नव्हती

मृत्युच्या दारात आणुन सोडणारी ती अमृता कधीच नव्हती ...


राग द्वेष अन ईर्ष्येने पछाडलेल्या तिला

सुबुद्धी खरंच येईल ?

स्वतःच्याच कपटी षडयंत्रामध्ये अडकलेल्या तिला

सुटका खरंच मिळेल ?

तिला तिच्याच ईर्ष्येच्या अग्निमध्ये जळूदे,

तिला तिच्याच कर्माच्या पश्चातापामध्ये होरपळु दे...


पण तु मात्र नेहमी तुझ्या सोबत असणाऱ्या शौर्यावरच

विश्वास असु दे,

तीच तुला त्या ध्रुवासारखी बनवेल

अन आकाशात असलेल्या असंख्य ताऱ्यांमध्ये

तुला तेजस्वी ध्रुविता बनवेल...


© तेजस्विता खिडके

0 views

©2019 by Tejaswita Khidake.