Search

तरी काय फरक पडला ?

त्यांनी तुझ्यावर चारित्र्य हीनतेचं

लेबल लावलं

तरी काय फरक पडला ?


त्यांनी तुला वेश्या ठरवण्याचा

अतोनात प्रयत्न केला

तरी काय फरक पडला ?


त्यांनी तुला वेडं ठरवण्याचाही

तर प्रयत्न केला

तरी काय फरक पडला ?


त्यांनी तुला भिकेला लावण्याचाही

तर प्रयत्न केला

तरी काय फरक पडला ?


त्यांनी तुझा अपघात घडवण्याचाही

प्रयत्न केला

तरी काय फरक पडला ?


त्यांनी तुला उग्रवादी ठरविण्याचाही

प्रयत्न केला

तरी काय फरक पडला ?


तुझ्या क्षमतेचं त्यांनी कौतुक करावं

एवढी खरंच त्यांची लायकी आहे ?


त्यांनी तुझ्या विरुद्ध कट रचले

तरी काय फरक पडला ?


त्यांनी तुझ्या गोपनीयतेच्या

मुलभुत अधिकाराचंही हनन केलं

तरी काय फरक पडला ?


तुझ्या मागे हेर सोडले

तुला नेस्तनाभूत करण्याचा एकूण एक प्रयत्न केला

तरी काय फरक पडला ?


खरंच , तरी काय फरक पडला ?

तरी काय फरक पडला ?

© तेजस्विता खिडके

0 views

©2019 by Tejaswita Khidake.