Search

झोपेच सोंग घेतलेली प्रेतं


लाज शरम विकुन खाल्ली आहे त्यांनी,

आता माणुस उरलाच कुठे त्यांच्यात,

उरली आहेत ती फक्त जिवंत प्रेते। 


व्यभिचारी प्रेतांची 

तितकीच व्यभिचारी विचारसरणी, 

इन्द्रियांच्या अधिन 

काही विव्हळताय श्वासोछस्वासासाठी, 

काही घाबरताय मरणाला,

काहींनी मात्र प्रेत होऊन

जगणं स्वीकारलय। 


अन्याय अत्याचार हे शब्द 

डिक्शनरीतच शोभनीय ,

त्याला वाचा फोडणं  

म्हणजे स्वतःच चांगल आयुष्य

खराब करणं च की,

त्यात ही सफेद कपडे घालुन

सुगंधित अत्तर लावून

पडून आहेत 

झोपेच सोंग घेतलेली प्रेतं च ती,

तू अगदी बेंबीच्या देठापासून आवाज दिलास

तरी ते उठणार आहेत का ?

पण आता इथवर येऊन मागे हटुन तरी कसं चालेल ?

तुच शुक्राचार्य आहेस अस समज ,

वापर संजीवनी विद्या,

बघ ती प्रेतं जागी होत आहेत,

प्रवृत्त होत आहेत,

अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी।


© तेजस्विता खिडके

0 views

©2019 by Tejaswita Khidake.