Search

कार्यकर्ता


तुम्ही साथ दिली म्हणुन नेता घडला, नसताच जर तुम्ही तर खरंच नेता असता ?


तुम्ही साथ दिली म्हणुन पक्ष घडला, नसताच जर तुम्ही तर खरंच पक्ष ही असता ?


शिट्ट्या तुम्ही च वाजवल्या, टाळ्या तुम्हीच वाजवल्या, जर शिट्या टाळ्या च नसत्या तर खरंच दादा घडला असता ?


वणवण तुम्हीच फिरले, रणरण उन्हात तुम्हीच तापले, खड्यात तुम्हीच पडले आणि परत उठून कामाला लागले तुम्हीच फिरले नसते तर खरंच साहेब निवडून आला असता ?


तुम्ही साथ दिली म्हणुन नेता घडला, नसताच जर तुम्ही तर खरंच नेता असता ? नसताच जर तुम्ही तर खरंच नेता असता ?


© तेजस्विता खिडके

0 views

©2019 by Tejaswita Khidake.