Search

काढा काढा बंडल काढा

काढा काढा बंडल काढा

लै दिसपासनं उपाशी हाये

आपलं चहा पाण्याचं काय ते बघा

काढा काढा बंडल काढा


साहेबांचं काय खरं दिसेना

आज हाये उद्या न्हायी

भेटलं तेवढं वरबाडा

चला रे, काढा बंडल काढा


कवाधरण म्हणतुया

जरा पोटाचं बी पहा

आता हाडकं फोडुन फोडुन खाऊ

आपलं मटणाचं काय ते बघा

काढा काढा बंडल काढा


गर्मीनी पार काहूर केल्यात

येऊ जरा गार होऊन येऊ

आता जरा खंडाळ्याला निघायचं बघा

ओ सायेब चला

काढा आता बंडल काढा


लै दिस झाल्यात जीवाला आराम न्हाय

जरा आपल्या सोयी च काय ते बघा

ओ सायेब अहो चला

काढा आता बंडल काढा

काढा आता बंडल काढा


© तेजस्विता खिडके

0 views

©2019 by Tejaswita Khidake.