Search

कुठ दिसंना कैवारी।


गोष्ट द्वापर युगाची,दुष्टाच्या संहाराची,

अहंकारी राजा अन,त्याच्या हो विनाशाची। 


निर्दयी,अत्याचारी,कंस तो हा दुराचारी,

नाश कराया अवतरला,कृष्ण देवकीच्या उरी। 


अवस्था कलीयुगाची,आहे मोठी विपरीत,

इथं मामा भाचे दोघं पापचे हो भागीदार।


नवा कृष्ण येई जन्मा,जन वाट पाहती,

पाप्यांचा नाश कराया,कुठं दिसंना कैवारी।© तेजस्विता खिडके

0 views

©2019 by Tejaswita Khidake.