Search

ओ बाळु काका जरा ऐका ना

तुम्ही प्रचार नाही केला तरी निवडून येऊ शकता, आहे ना तुम्हाला विश्वास, मग वायफळ खर्च थोडा कमी करा ना, ओ बाळु काका जरा ऐका ना... वाचला थोडा पैसा तर सतकार्णी लावता येईल, झालेल्या चुका सुधरवता येतील, नवीन पिढ्या घडवता येतील, बरच काही करता येईल, तुम्ही तुमची स्ट्राटेजी बदला ना, ओ बाळु काका जरा ऐका ना... या ना तुम्हीच परत निवडून, घ्या की सत्ता, आम्हाला चालतंय की, थोडा अहंकार बाजुला केला तर खूप काही भन्नाट होऊ शकत आपलं गाव, तुम्ही आता विकासाची कास धरा ना, ओ बाळु काका जरा ऐका ना... रोजगार निर्माण करण्याची गरज आहे, नाही तर गुन्हेगारी वाढत च जाणार, तरुण वाम मार्गावर जाऊ नये म्हणून आपण जवाबदारी स्वीकारा ना, ओ बाळु काका जरा ऐका ना... कुठलीच गोष्ट पर्मनंट नाही, झाल्या चुका सोडुन देऊन आता कशी सुधारणा करता येईल याचा विचार केला पाहिजे, काय केलं हे दाखवुन श्रेय घेण्या पेक्षा नवीन काय करता येईल हा विचार करा ना, ओ बाळु काका जरा ऐका ना... खुप पोटेन्शियल आहे हो तरुणांमध्ये, ती एनर्जी सन्मार्गाला लागली तर अख्या गावाच्या पुढच्या सात पिढ्या तुमचं नाव काढतील, माणूस जेंव्हा शरीर सोडुन जातो तेंव्हा मरतो का? की जेंव्हा त्याला सगळे विसरतात तेंव्हा खरा मरतो? मृत्यु अटळ आहे , त्रिवार सत्य आहे, पण रोजगार निर्मितीच्या चांगल्या कामानी तुम्ही अमर व्हा ना, ओ बाळु काका जरा ऐका ना... © तेजस्विता खिडके

0 views

©2019 by Tejaswita Khidake.