©2019 by Tejaswita Khidake.

Search

इन्कलाब ची पहाट
का गं, अशी उदास का?

अगं वेडे, तु हरली नाहीस,

लोकशाही हरलीय.


स्वतःच्या तत्वांशी प्रामाणिक राहीलीस,

त्याचं फळ असावं ते कदाचीत.


घेतले असते अकरा लाख

तर बरं झालं असतं,

वाटणं सहाजीक आहे.


तुला सूर्यास्त दिसला

म्हणुन खचलीस का गं ?


ती बघ पलीकडे

दिसतीय का इन्कलाब ची पहाट,

परत सूर्योदय होतोय,

तुला जिंकवण्यासाठी नविन पाखरांचा चिवचिवाट !

ऐकतेस ना ?


© तेजस्विता खिडके

0 views