Search

आयुष्य ही सिनेमा सारखं असावं...

Updated: Jan 28


रुसवे फुगवे नसावे, कसल टेंशन नसावं, सगळ कसं फेवरेट असावं, आयुष्य ही सिनेमा सारखं असावं... रडण बोंबलन नसावं, भांडण नसावी अन् कुणाची च कटकट नसावी, सगळं कसं जॉयफुल असावं, आयुष्य ही सिनेमा सारखं असावं... शाळेतल्या गप्पा असाव्या, थट्टा मस्करी असावी, गॉसिप अन् लपवाछपवी ही असावी, एखादी तीन तासाची मूव्ही असावी, इंटरेस्टिंग सुरुवात असावी, मध्ये थोडा इंटर्वल अन् मग दी एंड, आयुष्य ही सिनेमा सारखं असावं... © तेजस्विता खिडके

0 views

©2019 by Tejaswita Khidake.