Search

आधी कुत्र्याला वेडं ठरवा, मग मारा ...


आधी एक कुत्रा शोधा

नाहीच सापडला तर पैदा करा ..

मग त्याच्या शेपटावर पाय द्या ,

त्याला उपाशी ठेवा, त्याला पाणी देखील पाजु नका,

तो तहान अन भुकेने विव्हळायला लागला की मारा,

त्याला सळो की पळो करून सोडा,

त्याला भीती दाखवा, मग तो घाबरेल ..


आता त्याला मोकळं सोडून द्या ...


आता तो स्वतःलाच कोंडून घेईल, रडेल पण

स्वतःच्याच तुरूंगातून बाहेर येण्यासाठी धडपड करणार नाही..

कुणात मिसळणार नाही,कुणाशी बोलणारही नाही ,

आता, आता त्याला वेडं ठरवा ...


स्वतःवर झालेल्या अन्यायाची त्याला जाणीव होऊ द्या

मग तो पेटून उठेल अन गुरगुर करत चावायला धावून येईल ..

आता, आता त्याला गुन्हेगार ठरवुन गोळ्या घाला अन मारून टाका ...


आधी कुत्र्याला वेडं ठरवा, मग मारा ...

आधी कुत्र्याला वेडं ठरवा, मग मारा ...


© तेजस्विता खिडके

0 views

©2019 by Tejaswita Khidake.