Search

आणि अजून बरच काही


ते महिलांनी एकमेकींना पुढे न्यावं,

एकमेकींची साथ द्यावी वगैरे हे सगळं महिला दीना पुरत बोलणं ठीक आहे हो,

पण त्या जेलसीच काय ?


कुणी चांगली दिसते तर तिला नाव ठेवणारी पण महिलाच कि,

काय तर म्हणे लूक्स आहेत तिच्यात, अगं असुदे ग ,पण तू का जळते?


कुणी करियर साठी धडपडत असेल तर, काय तर म्हणे,

अगं कशाला करतीय जीवाचा आटापिटा, आहे ना नवरा , ते आमचं आम्ही बघू ग, पण तुझं का पोटात दुखतंय ?

कुणी गृहिणी असेल तर काय ,

अगं एवढी शिकली आणि खुशाल घरी बसते, काहीतरी कर ,अगं असुदे ग पण तुझा सल्ला मागितला कुणी ?

कुणी जरा पॉप्युलर होत असेल तर काय,

हिचं काहीतरी काळंबेरं नक्की असणार, १०० जणांसोबत झोपली असणार, अगं किती हा जळकुटे पणा ।


कुणी घटस्फोट घेतला असेल तर काय,

हिचीच काहीतरी चूक असणार, अगं तुला माहित आहे का तिच्या घरात काय अडचणी आहेत ते ?


आणि अजून बरच काही ,,,,,,, हे जरा विचार सुधरवले तर वर म्हटल्या प्रमाणे एकमेकींना पुढे न्यावं,

एकमेकींची साथ द्यावी वगैरे हे सगळं कदाचित शक्यही होईल ।


© तेजस्विता खिडके

0 views

©2019 by Tejaswita Khidake.