Search

आठवतो तुला


आठवतो तुला तो वाहत्या झर्याचा आवाज,

जगाचा विसरच पडला होता जणु ऐकताना.


आठवते तुला ती हिरवळ, किती सुंदर होत ना ते द्रुश्य ,

अगदी मनाला आनंदीत करणार.


आठवतो तुला तो मंद वारा, अन तो पाऊस,

हलकेच आपल्याला स्पर्श करून सुखावणारा.


आठवतात तुला ते प्रेम पाखर,

किती तरी वेळ, आपण त्यानाच पाहत होतो.


आठवते तुला ते निसर्गरम्य वातावरण,

त्या आठवणीत आजही हरवुन जावस वाटत.


चल, जाऊ परत एकदा, त्याच जागी,

परत एकदा त्याच दगडावर उभ राहु,

तोच अनुभव परत घेऊ,

परत एकदा हरवुन जाऊ, एकमेकांत.


© तेजस्विता खिडके

0 views

©2019 by Tejaswita Khidake.