Search

आज तो आला


आज तो आला, थेंबांच्या रुपात।

त्याची आतुरतेने वाट बघणाऱ्या तिला तो भेटला।


आज तो आला, विजांच्या कडकडाटात।

चातक पक्ष्याप्रमाणे आस लावुन बसलेल्या तिला तो भेटला।


आज तो आला, वाऱ्याच्या उधानात।

विरह दुःखात बुडलेल्या तिला तो भेटला।


तो पाऊस अन ती धरणी,

आपल्या प्रेमाच्या ओलाव्याने तिला भिजवून तो क्षणातच निघून गेला, परत येण्यासाठी।© तेजस्विता खिडके

0 views

©2019 by Tejaswita Khidake.