Search

आक्रोश


त्या भांडभटाचा खानदानी धंदा

मयताच्या चितेवर भाकर भाजुन खाय

भरले खिसे खानदानी उचल्यानी

परी कितींची घेतली हाय हाय ...


भोळेभाबडे सामान्य

भांडत राहिले एकमेकांत

कपटी भांडभटाच्या डोक्यात मात्र

शिजत होत भलतंच कांड ...


गुण्या गोविंदाने राहत होते सारे

हिंदू अन मुस्लिम

भांडभटाने करून मुद्दा सारे पेटविले रान

भडकविली आग

अन घडवूनी दंगल पेटविले दुकान ...


झाले बत्तीस वर्ष तरी ती आग विझली नाही

प्रतिशोध घेतल्याशिवाय नियतीही राहणार नाही ...


करुनि हवन तु माझा वंश जाळीला,

आता बारी तुझी यंदा जळणार तुझा रे वाडा ...


कितीही जाणिले वेद तरी कर्मातून मुक्ती नाही

तुच विणलेल्या जाळ्यातुनी तुझी सुटका नाही ...


जा वाचव आला जर वाचवता तुझा रे वाडा,

रहा तयार भोग भोगवया होणार आहे राडा ...


या हातानी घडवलेल्या विश्वाला जळताना मी डोळ्यांनी पाहिले

अन झुरत झुरत मी मृत्यूलाही कवटाळिलें ...


ईश्वराशी कपट चालेल? चांडाळा

भ्रम रे तुझा भांडभटुकड्या

हा मी लिहत आहे , गोष्ट तुझ्या कर्माची

घडणार तंतोतंत असेच हि साक्ष परमात्म्याची ...

हि साक्ष परमात्म्याची ...


© तेजस्विता खिडके

0 views

©2019 by Tejaswita Khidake.