Search

अखेरचा राम रामभीक मागत फिरलो दारोदारी अन्ना साठी वणवण फिरत होतो


जित्यापणी नाही रे खाऊ घातले मेल्यावर आता घालतो दहावे तेरावे


मौत माझी झाली खरी पण मेलो मी कधीचाच होतो


तेंव्हा तुला मी दिसलो नव्हतो आता करणार तु मौत माती माझी


खोट्या समाजाला करशील आता खोटा देखावा रचशील सरण अन देशील अग्नी डाग मला


अखेरचा निरोप माझा घेशील आज खरा मारशील प्रदक्षिणा, फोडशील घडा


करशील पिंड दान, मी कावळा होऊन येईल ? का ? कशासाठी ?


सडुन सडुन गेले शरीर माझे तरीही ठेविले तु तसेच , तुझ्या स्वार्था साठी


मौती चा ही दिवस माझा तुच ठरवलास तुझ्या फायद्यासाठी


जगास दाखव किती ही दिखावा मनापासून कुठे धावशील


मी भुतकाळ जाहलो आज तु ही नाहि सदा सर्वदा


जीत्यापनी मी स्वर्ग पाहिला अन पचलो मुता कुतात तेंव्हा नर्क ही पाहिला


सोडुनिया सर्वस्वा आता चालिलो मी माझ्या गावा करितो नमन हा माझा अखेरचा राम राम घ्यावा ..


© Tejaswita Khidake

0 views

©2019 by Tejaswita Khidake.